Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण कार्यक्रम भाजपाकडून 'हायजॅक’ =================== स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांना डावलले : न.पं. विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांचा आरोप


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण कार्यक्रम भाजपाकडून 'हायजॅक’
===================
स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांना डावलले : न.पं. विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांचा आरोप
===================
Chhatrapati Shivaji Maharaj's effigy unveiling program 'hijacked' by BJP
 ,
 Local officers and officials Dawalle: N.P. Opposition leader Ashish Kawatwar's allegation

दरारा 24 तास

पोंभुर्णा : स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने हाय जाग केल्याचा आरोप विरोधी गटनेता आशिष कावटवार यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज १९ फेब्रुवारी रोजी पोंभुण्यात होत असतानाच नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक समितीकडून होत असलेला हा अनावरण कार्यक्रम पूर्णपणे चुकीचा असून भाजपाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप केला आहे.


शासनाच्या निधीचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा या प्रकरणी न्यायालयात धाव घेणार असल्याचे कावटवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आम्हाला आदर आहे. कार्यक्रमालाही आमचा विरोध नाही. मात्र पुतळा स्मारक समितीने भाजपाप्रणित कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचा आम्ही विरोध करीत आहोत असेही त्यानी स्पष्ट केले.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व सौंदर्गीकरणासाठी अंदाजे ३५ लाख रुपये खर्च करण्यात आला असल्याचे सांगत २२ ऑगस्ट २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरिता साहित्य पुरवठ्याचा दर निश्चित करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता. संपूर्ण कामासाठी रस्ता अनुदान अंतर्गत २४ लाख ९३ हजार ४३३ रुपये निधी शंभु फायबर आर्ट, शेगाव यांना कामाचे कार्यादेश २७ जानेवारी २०२० रोजी देण्यात आले होते.

 ७ फेब्रुवारी २०२३ ला नगराध्यक्ष सुलभा पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायतच्या विशेष सभेत शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी चर्चा करून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष रुषी कोटरंगे यांना लोकवर्गणीतून पुतळा बसविण्यासाठी नाहरकत प्रदान करण्यात आली. ही जागा ३ वर्षांकरिता भाडेतत्त्वावर देण्यात आली व करारनामा लिहून घेण्यात आला. याच करारनाम्याचा आधार घेत जिल्हाधिकारी यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी आदेश देताना स्मारक समितीकडे आदेशानंतर पुतळा उभारण्याबाबत संपूर्ण खर्च स्मारक समितीने करावा तसेच भविष्यात पुतळ्याची देखभाल व दुरुस्ती याकरिता शासनाकडे निधीची मागणी करता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. 


जिल्हाधिकारी यांनी अटी व शर्ती लागू केले असताना नगरपंचायतचे मुख्याधिकारी आशिष घोडे यांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी वार्ड नंबर १४ मधील शिवाजी महाराज पुतळा परिसर व चौकातील सौंदर्गीकरणासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ८ लाख २३ हजार १८५ रुपये निधी खर्च करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहरकत प्रमाणपत्र दिले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्ती नगरपंचायत पोंभुर्णामार्फत करण्यात येणार असल्याचे प्रमाणपत्र देऊन स्पष्ट केले होते. परंतु, भाजपाकडून हा कार्यक्रम पूर्णपणे हायजॅक केल्याचा आरोप कावटवार यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments