शाळेत कबड्डी खेळताना दोन विद्यार्थी गंभीर जखमी!
मुख्याध्यापक पिंपळशेंडे म्हणतात शुल्लक बाब!
पालकांनी जखमी विद्यार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठले!
कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करा-सरपंच राहुल भाऊ पाल👍
पोंभुर्णा: मॉडेल स्कूल म्हणून तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या व चर्चेत राहिलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनगाव येथे कबड्डी खेळताना दोन विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले. एकाच्या डोळ्या जवळ तर दुसऱ्याच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली असून विद्यार्थी रक्तबंबाळ अवस्थेत शाळेतून घरी परतले. परंतु शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शुल्लक बाब म्हणून या बाबीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांची अवस्था बघून तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांचे वर उपचार सुरू केला.
मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर करत गंभीर रित्या जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना साधा उपचार तर नकोच परंतु त्यांच्या घरी सुद्धा पोहचवून दिले नाही. शाळेतील विद्यार्थ्यांनीच या जखमी विद्यार्थ्यांना घरी पोहोचवून दिले.
सदर बाबीची माहिती सरपंच व भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल, व माजी सरपंच शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांना होताच त्यांनी गुरुवारी शाळा गाठली. शाळेत उपस्थित असलेले मुख्याध्यापक पिंपळशेंडे यांच्याशी भेट घेऊन सदर प्रकरणी विचारणा केली असता, शुल्लक बाब असल्यामुळे आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो नाही. असे बेजबाबदारीपणाचे व हास्यास्पद उत्तर दिले.
एकीकडे दोन्ही विद्यार्थी रक्तबंबाळ झालेले असताना मुख्याध्यापक शुल्लक बाब मानत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार मुख्याध्यापकावर तात्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालकांनी व सरपंच राहुल भाऊ पाल यांनी केली आहे.
जखमी विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी आज दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी सरपंच राहुल भाऊ पाल व माजी सरपंच जीवनदास गेडाम, प्रकाश भाकरे सामाजिक कार्यकर्ता,यांच्या नेतृत्वात गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठून तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीच्या प्रति जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री, नामदार सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पाठवलेल्या आहेत. सदर प्रकरणात काय कारवाई होते याकडे पालकांचे लक्ष लागलेले आहे.
========================
शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर एवढा मोठा प्रसंग उडवल्यानंतरही शाळेचे मुख्याध्यापक पिंपळ शेंडे हे सामान्य बाब असल्याचे बोलून दाखवतात. त्यांचा कार्यकाळ हा अत्यंत वादग्रस्त राहिलेला असून यापूर्वीसुद्धा त्यांचे अनेक कारनामे उजेडात आलेले आहेत. शालेय पोषण आहार, शाळेतील संगणक इत्यादी प्रकरण यांच्या कार्यकाळात गाजलेले आहेत. काल घडलेल्या घटनेत ते अत्यंत बेजबाबदारपणे बोलत असल्यामुळे त्यांचे वर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी.
=====================
शिक्षकांनी शिकवण्याच्या बदल्यात गले लठ्ठ पगार घेतात. परंतु पगार आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी घेतो. त्यांच्यासाठी आम्हीच पालक आहोत आणि पालकाची जबाबदारी आम्ही योग्य रीतीने पार पडली पाहिजे असे शिक्षकांना वाटून त्यांनी आपले शैक्षणिक कार्य योग्य रीतीने पाडून विद्यार्थ्यांची देखभाल केली पाहिजे. व उत्कृष्ट असा विद्यार्थी घडवला पाहिजे. काल झालेल्या प्रकरणात पूर्णपणे शिक्षक दोषी असून त्यांचेवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे...
प्रकाश भाकरे, प्रॉपर्टी डीलर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता
=====================
बाहेरगावी राहून 30 ते 40 किलोमीटर अंतर पार करून शाळेवर येणारे शिक्षक गलेलठ्ठ पगार घेतात. मात्र पगाराच्या बदल्यात ते त्यांच्या कर्तव्यात कसूर करतात. कर्तव्य विसरतात असाच आजचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते जर कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अमलात आणायचे असतील तर अशा बेजबाबदार शिक्षकांना धडा शिकवणे काळाची गरज आहे.
-जीवनदास गेडाम, माजी सरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख पोंभुर्णा
0 Comments