Ticker

6/recent/ticker-posts

आत्ताची ब्रेकिंग न्यूज-उमरी पोतदार येथील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश।



शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे राहणार उपस्थित

पोंभुर्णा: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे महाराष्ट्रातील संपूर्ण गावागावात प्राबल्य वाढत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत प्रत्येक गावातील इतर पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी व युवक शिवसेनेत उत्स्फूर्तपणे प्रवेश घेत आहेत.

आज दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी तालुक्यातील उमरी पोतदार येथील शंभर पेक्षा जास्त युवक शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेणार आहेत. या पक्षप्रवेशासाठी होणाऱ्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमात जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिरे हे उपस्थित राहून सर्वांना शिवबंधन बांधतील. अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, नगरपंचायत चे विरोधी गटनेता आशिष भाऊ कावटवार, यांनी दिली आहे.
तालुक्यात शिवसेना वाढीस लागली असून सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments