सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या संदर्भात उपविभागीय अधिकारी मुल यांच्या बालनात सभा
पोंभुर्णा प्रतिनिधी
माननीय भारत निवडणूक आयुक्त यांनी काल दिनांक 16 मार्च 2024 रोजी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने दिनांक 17 मार्च 2024 रोजी दुपारी चार वाजता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी मुल यांचे दालनात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेकरिता पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading