Advertisement

प्रतिभाताईंना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसला नवसंजिवनी मिळणार- विनोदभाऊ अहिरकर, उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग तथा माजी उपाध्यक्ष जि.प. चंद्रपूर


प्रतिभाताईंना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसला नवसंजिवनी मिळणार- 


विनोदभाऊ अहिरकर, उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग तथा माजी उपाध्यक्ष जि प चंद्रपूर


 विजय जाधव (तालुका प्रतिनिधी) 

मुल :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर अनेक विचारवंत विचारमंथन करीत असून विविध राजकीय पक्षाकडून अनेकांची नावे चर्चेत आहेत. या निवडणुकीच्या तोंडावार लोकसभेचे दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी भाजपाचा बालेकील्ला उध्वस्त करून माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराजजी अहिर यांना निवडणुकीत धुळ चारली होती.


 परंतू बाळुभाऊ धानोरकर यांचा अकस्मात मृत्यु झाल्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती ,भद्रावती- वरोरा क्षेत्राच्या विद्यमान आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांचे नाव आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कडुन चर्चेत आहे. महाराष्ट्राची एक राजकीय परंपरा असुन सहानभुती म्हणुन विरोधी उमेदवार दिल्या जात नाही. परंतू चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा क्षेत्रात अनेक दावेदार विविध पक्षाकडून मोर्चाबांधनी सुरू केल्याचे दिसून येत आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. मान, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना लोकसभेची काँग्रेसकडून उमेदवारी प्राप्त झाल्यास निश्चीत त्या प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि काँग्रेसला नवसंजिवनी मिळणार असल्याचे मत महाराष्ट्राचे काँग्रेसचे ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष तथा जि.प. चे माजी उपाध्यक्ष विनोदभाऊ यांनी व्यक्त केले आहे.


 मा. बाळुभाऊ बानोरकर लोकसभाक्षेत्रामध्ये हयातीत असतांना अनेक विकासकामे केलेली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवुण दिलेला आहे. खासदारकीची पेशंन सुध्दा त्यांनी निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना दिलेली आहे. बाळुभाऊ धानोरकरच्या नावाने त्यांनी शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गोरगरिब, दीनदलीत, शोषीत पिडीत, निराधार, अपंग, असहाय्य लोकांना उचित न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या सुध्दा आपल्या कार्यात कोणतीही कसर बाकी न ठेवता आपले सर्व दुःख विसरून आपल्या पतीच्या कार्याला वाहून घेतले आहे. 


 भद्रावती निर्वाचन क्षेत्राच्या पलीकडे जावून संपूर्ण लोकसभाक्षेत्रात त्यांनी जनतेची कामे कशापध्दतीने होतील त्या पध्दतीने करण्याचे सत्कार्य त्यांनी अविरतपणे सुरू ठेवले आहे. पक्षाची निष्ठा ठेवून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडून त्यांनी संपूर्ण लोकसभाक्षेत्र पिंजुन काढलेला आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास हमखास त्या निवडून येतील आणि निश्चीतच या क्षेत्रात काँग्रेसचा बोलबाला राहील अशी ग्वाही सुच्दा विनोद अहिरकर यांनी दिलेली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची प्रतिभाताईंना उमेदावारी मिळावी ही मनस्वी ईच्छा आहे. त्यांना पक्षश्रेष्टींनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पक्षाची उमेदवारी द्यावी, हजारो कार्यकर्ते त्यांना निवडून आनण्यासाठी शतीचे प्रयन्त करणार आहे. असे मत सुध्दा विनोदभाऊ अहिरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या