Advertisement

चिचडोह् प्रकल्पाचे वैनगंगा नदी पात्रात सोडा-सरपंच राहुल पाल यांची मागणी


चिचडोह् प्रकल्पाचे वैनगंगा नदी पात्रात सोडा-सरपंच राहुल पाल यांची मागणी

जुनगाव: अजित गेडाम, प्रतिनिधी 
     पोंभुर्णा तालुक्यातील वैनगंगा नदी काठील बहुतेक गावात पिण्याच्या पाण्यासह शेत पिकासाठी पाहण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असल्याने चिचडोह प्रकल्पातील पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा जूनगाव ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल पाल यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

      तालुक्यातील जुनगाव, देवाडा बुज, पिपरी देशपांडे, चेक ठाणा, घाटकुळ,, गंगापूर, टोक, व बऱ्याच गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून उन्हाळी धानपिक व मक्याचे पीक आणि इतर पिकांवर संकट उभे ठाकले आहे.

नदीतील पाणी पातळी कमी झाल्याने किंबहुना कोरडी झाल्याने पाणीपुरवठा विभागाच्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्या दूर करण्यासाठी तात्काळ चिचडोह प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सह शेतकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या