नागपूर (विशेष प्रतिनिधी): नागपूरातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडारस्त्यावर सोमवार दि. ४ मार्च रोजी संध्याकाळी ७/७:३० च्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. बिबट्या रस्ता ओलांडताना वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला असून या बिबट्यावर वनविभागामार्फत उपचार सुरू आहेत.
“जखमी असलेला बिबट्या दोन अडिच वर्षांचा असून त्याच्या दोन पायांमध्ये फ्रॅक्चर आहे. बिबट्याच्या पाठीच्या कण्याला ही गंभीर दुखापत झाली असल्याची शक्यता असून त्यासाठी त्याचे एक्स रे काढण्यात येणार आहे. सरकारी आणि खाजगी अनूभवी डॉक्टरांच्या माध्यमातून या बिबट्यावर उपचार केले जात असून वनविभाग बिबट्याला वाचविण्याचे पुर्ण प्रयत्न करत आहे”, अशी माहिती नागपूरचे उपवनसंरक्षक डॉ. भरतसिंह हांडा यांनी बोलताना दिली.
0 Comments