नांदगाव येथे गजानन महाराज प्रकट दिन साजरा
नांदगाव/प्रतिनिधी
मुल तालुक्यातील बहु चर्चित संत राजच्या जी महाराज यांच्या पवित्र पावनस्पर्शाने पुनीत नांदगाव नगरीत गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला. यावेळी ढोल ताशे आणि मृदुंगा च्या गजरात भक्तजनांनी भव्यदिंडी काढण्यात आली.
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद भाऊ अहिरकर यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पमालेने पूजन केले. तदनंतर गावातून विनोद भाऊंच्या नेतृत्वात भक्तजनांनी भव्यदिंडी काढली. दिंडीच्या निरोपानंतर उपस्थित भक्तांना व गावकऱ्यांना झुणका भाकर आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी विनोद भाऊ अहिरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा छोटे खानी कार्यक्रम साजरा करण्यात आला. ग्रामस्थांचा सहभाग लाभल्यास भविष्यात यापेक्षाही उत्कृष्ट कार्यक्रम करू, अशी ग्वाही माननीय विनोद भाऊ अहिरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली. आणि गावकऱ्यांचा सहभाग लाभल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Thanks for reading