विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान असणे काळाची गरज-सरपंच राहुल भाऊ यांचे प्रतिपादन
जुनगाव जिल्हा परिषद शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम-विद्यार्थ्यांनी भरविला बाजार (मंडई)
अजित गेडाम, तालुका प्रतिनिधी
पोंभुर्णा: सर्वांसाठी विशिष्ट शिक्षण पद्धती वेगळी करायची असेल तर विद्यार्थ्यांना बालवयापासूनच व्यवहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना सिद्धांतावर आधारित शिक्षण पद्धती इतकेच व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यवहारिक ज्ञान मिळाले पाहिजे. असे प्रतिपादन जूनगावचे सरपंच श्री राहुल भाऊ पाल यांनी शाळेतील बाजार मंडईच्या उद्घाटन प्रसंगी केले.
वेगवेगळे उपक्रम राबवून तालुक्यात मॉडेल स्कूल म्हणून नावारूपास आलेल्या जुनगाव शाळेत शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या मार्फतीने शाळा परिसरात बाजार भरवण्यात आला. बाजारात विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाजीपाला खाद्यपदार्थ, मेथी, टोमॅटो, कोबी, मिरची, वांगे, समोसे, पुरी भाजी, चहाचे दुकान, व विविध प्रकारचे दुकान या बाजारात पहावयास मिळाले.
विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान बालपणापासूनच असावे यासाठी हा अनोखा उपक्रम शिक्षकांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी, उद्घाटक म्हणून सरपंच राहुल भाऊ पाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच जीवनदास गेडाम, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष देवराव आभारे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष खुशाल भोयर, सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा कार्यकर्ते प्रकाश भाऊ भाकरे, जगन्नाथ चिंचोलकर,*बट्टे सर, कोसरे सर, चुदरी सर, मडावी सर, डोंगरावर सर,कु.विद्या गेडाम* व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments