पोंभुर्णा, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा तालुक्यांतील गावे 'समृद्धी'ला जोडणार
जिवनदास गेडाम (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर : नागपूर ते मुंबईला जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यापूर्वीच सुरू झाला आहे. या मार्गाला आता राज्यभरातील अन्य मार्ग जोडण्यात येणार आहेत. रस्ते विकास महामंडळाने तयार केलेल्या आराखड्यात जिल्ह्यातील पोंभुर्णा, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा या तालुक्यांतून नवा मार्ग जाणार आहे. ज्या-ज्या ठिकाणाहून मार्ग जाणार आहे त्या ठिकाणी मार्किंग केली आहे. यासंदर्भात शासनाने काढलेल्या राजपत्रात सर्व्हे क्रमांकही नमूद करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या सेलडोह इंटरचेंजवरून वरोरा, भद्रावती ते राजुरा, पोंभुर्णापर्यंत हा मार्ग जोडला जाणार आहे. समृद्धीलाच जोडणारा घुग्घुस इंटरचेंज ते चंद्रपूर जोडरस्ता राहणार आहे. या मार्गामुळे चंद्रपूरसह अन्य जिल्ह्यांच्या विकासाला हातभार असून, नवनव्या उद्योगांनाही चालना मिळणार आहे.या तालुक्यांतील गावांतून जाणार मार्ग ..वरोरा,वरोरा: जामगाव स्वतः, जामगाव, परसोडा, वलनी, नमग्राम, खातोडा, सालोरी, बोरगाव देशपांडे, आसाळा, पित्तदुरा, पाचगाव (ठाकरे), पांढरतळा, बोपगाय शिवनफळ, मांडवगुहाड, सुमठाना, चकवडापूर, चकसुर, बोमकर,बोकसूर,कोरपना:नवेगाव, कोराडी, नांदगाव, भोयेगाव,राजुरा: चुनाळा, बामनवाडा, गडपडखामी, धोपटाळा, माधरा, गोवरी, गोयेगाव, अंतरगाव (खुर्द), चिचोली (खुर्द), हिरापूर चिंचोली साखरी, निमनी, वरोडा,
भद्रावती: मुरसा, घोनाइ, पिपरी, तेलवासा, ढोरवासा, चारगाव, कुनाडा दोला, विज्ञासन, कुरोडा, कांडा, खंडाळा रिठ, गोटाळा रीठ, चोपनरीठ,भद्रावती,चंद्रपूर,बल्लारपूर, पोंभुर्णा : घाटकुळ, चक ठानेवासना, नर्वगाव मोरे, चक खापरी, पेळया चक, आष्टा, चक, पोंभुर्णा, कसरगट्टा, बोर्डा दीक्षित, घनोटी तुकूम, चक प्रनोटी २, बल्लारपूर : कवडजई, किन्ही, पळसगाव, कोर्टीमवत्ता, जेवरा, जोगापूर, कळमना, आष्टी.
माती परीक्षणासाठी
===================
ज्या शेतातून मार्ग जाणार आहे. त्या- त्या शेतातील तसेच परिसरातील मातीचे परीक्षण केले जाणार आहे. यासाठी विविध ठिकाणची माती नेण्यात आल आहे. या माती परीक्षणातून रस्त्याच्या मजबुतीसाठी विशेष प्रयत्न होणार आहे.
मार्किंगही केली
■ समृद्धीला जोडण्यासाठी जिल्ह्यातून आता नवीन मार्ग जाणार आहे. यासाठी रस्ते विका महामंडळ, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतांमध्ये मार्किंग केली आहे. त्यामुळे आपले शेत जाणार हे आता शेतकऱ्यांना कळले आहे.
योग्य मोबदला द्या
===================
जिल्ह्यातून समृद्धी मार्ग जाणार आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. क ठिकाणी शेतातील अगदी एक कोपराच जाण आहे. तर काही शेतकयांच्या रोतातून मधोमध रस्ता जाणार आहे. रस्त्यासाठी जमीन अधिग्रहि करा. मात्र, शेतकयांना योग्य मोबदला द्या, अ मागणी अन्नदाता एकता मंचच्या वतीने शासनाकडे केली आहे.
0 Comments