Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत व जि प शाळा जुनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा


ग्रामपंचायत व जि प शाळा जुनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग-सरपंच (प्रभारी) राहुल भाऊ पाल यांनी केले उद्घाटन


जुनगाव : (अजित गेडाम)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 7 मार्च 2024 रोजी जुनगाव येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विशेष बाब म्हणजे 8 मार्च हा जागतिक दिनाचा दिवस असला तरी या दिवशी महाशिवरात्री चा पवित्र पर्व असल्यामुळे सात मार्च रोजीच हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या विद्यमाने करण्यात आला होता. सरपंच राहुल भाऊ पाल यांनी स्वतः पुढाकार घेऊन या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच राहुल भाऊ पाल यांच्या हस्ते करून उद्घाटन करण्यात आले.
=============================
2023 - 24 वर्षात जन्मलेल्या बालक व मातेचा सन्मान आणि सत्कार
======°==°===°========°======°=
यावेळी 2023 , 24 या वर्षात जन्मला आलेल्या स्त्री बालकाला त्यांच्या मातेसह शाल आणि श्रीफळ देऊन राहुल भाऊ पाल यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मान, सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मंचावर सरपंच राहुल भाऊ पाल, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उज्वल ग्राम संघाच्या अध्यक्ष आशाताई झाडे, संगीता ताई झबाडे,माजी सरपंच व पत्रकार जीवनदास गेडाम, शाळा व्यवस्थापन समितीचे उपसभापती देवराव भाऊ आभारे, समिती सदस्य संजय भोयर, ग्रामपंचायत सदस्य चुधरी मॅडम, धोटे मॅडम, ग्रामसेवक चांदेकर, पाल मॅडम, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी महिला दिनाविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक, श्री बट्टे सर यांनी, तर सूत्रसंचालन कोसरे सर यांनी केले. मळावी सर,डोंगरवार सर, गेडाम मॅडम व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले.










Post a Comment

0 Comments