दरारा 24 तास न्युज नेटवर्क
पोंभूर्णा: येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप भाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा सन्मान स्त्री कर्तुत्वाचा कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्सवात सप्नन झाला.
या कार्यक्रमाला सौ. मनस्वीताई संदिप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती तर शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ. कल्पनाताई घारगोटे,महिला आघाडी तालुका प्रमुख तथा आष्टाचे सरपंच सौ.किरणताई डाखरे,नगरसेविका सौ.रामेश्वरी वासलवार, सौ.कांताबाई मेश्राम, सौ.ललिताताई कोवे,श्रीमंती भावीकाताई मडावी, सौ. अर्जणाताई कोसरे सौ. सोनिताई मानकर, सौ. रेखाताई निमगडे, सौ. रोषनीताई देवतळे, सौ. सूनिताताई गोरंतवार, सौ. मिनाताई इप्पलवार सौ. रजनाताई कोटरंगे, सौ.अर्जना गिरसावडे, सौ.सुनीता कुनघाडकर, सौ. मीनाताई ढोले, सौ.मगलाताई कांनपेलीवार, व आदी महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध खेळ घेण्यात आले संगीत खुर्ची,लिंबू चमचा, पोत्या वरील उड्या,दोन पाय उडी, उखाने स्पर्धा व आदी खेळ घेण्यात आले.या मद्ये विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीया विजेत्यांना मानाची पैठणी, नवारी साडी, इरकणी पैठणी व सन्माचिन्ह देऊन पारितोषिके देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती होती.
0 Comments