Ticker

6/recent/ticker-posts

*▪️शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पडझड घरांचे तात्काळ पंचनामे करून नुसकान भरपाई द्या* *● पोंभुर्णा शिवसेनेची तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

*▪️शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पडझड घरांचे तात्काळ पंचनामे करून नुसकान भरपाई द्या*

 *● पोंभुर्णा शिवसेनेची तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी* 


*पोंभूर्णा/२३जुलै.*

दिनांक १८ ते २१ जुलै दरम्यान तालुक्यात अतिमुसळधार सदृश्य पाऊस झाला. झालेल्या या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मुख्य अंधारी नदीने रौद्र रूप धारण केल्याने तालुक्यात पुर परस्थिती निर्माण झाली.जवळजवळ तीन ते चार दिवस नदीचे पाणी कमी झाले नाही.त्यामुळे हजारो हेक्टर मधील शेतपीकांना चांगलाच फटका बसला आहे. पोंभुर्णा तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जात असून येथील मुख्य व्यवसाय शेती आहे.पण तीन ते चार दिवसाच्या पाण्याने तालुक्यात पूर परस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांचे धान पऱ्हे व रोवलेले धानाचे पीक तर वाहून गेलेच,शिवाय शेतात ठेवलेले खते सुध्दा पुराच्या वाहून गेले असून कापूस,सोयाबीन पिकाला मोठा फटाका बसला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात मुसकान झाले आहे.

 याशिवाय अती पावसामुळे बऱ्याच गावातील घरांची पडझड सुध्दा झालेली आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतीचे पंचनामे आणि पडझड घरांचे पंचनामे करून तात्काळ गरजूंना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांनी तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनातून केली आहे.यावेळी विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर,शहर प्रमुख संतोष पार्लेवार,उपतालुकप्रमुख नंदू पोतराजे,शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Post a Comment

0 Comments