पोंभूर्णा: तालुक्याची भौगौलिक परीस्थीती पाहता चौफेर नदि व नाल्यांनी वेडलेले आहे त्यामूळे नैसर्गीक अतीवृष्टी पूर परिस्थितीचा सामाना दरवर्षी पोंभूर्णा तालुक्यातील शेतकर्यांना करावे लागत आहे अशातच जिल्हा प्रशासन विरई डॅम व काहि डॅमचे दरवाजे उघडल्याने नेहमी पोंभूर्णा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या पिकपेराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आताची परिस्थिती पाहता अनेक शेतकर्यांनी रोवनी केलेले पिक आतापर्यंत पुराच्या पाण्यात बुडून होते तसेच सोयाबीन व कापूस अन्य भाजीपाला व पिके शेतकर्याच्या हातचे गेले आहेत. पोंभूर्णा तालुक्यातील शेतकरी पूर परिस्थितीमूळे हवालदिल झाला आहे.अशातच अनेक लोकांच्या घराची पडझड झाली आहे आणि नेहमी या परीस्थीतीला पोंभूर्णा तालुका तोंड देत आहे त्यामुळे शेतकर्यांना नूकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीकोनातून शेतकरी निहाय मोकाचौकाशी करून कोणत्याही अटी व शर्ती शिवाय नुकसान भरपाई जाहीर करण्यात यावी या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार मनसेचे जिल्हा सचिव (बल्लारपूर विधानसभा) किशोर मडगुलवार यांच्या मार्गदर्शनात मनसेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपतीवार, मनविसे तालुकाध्यक्ष आशिष नैताम, मनविसे शहराध्यक्ष पवन बंकावार यांच्या उपस्थीतीत तहसीलदार साहेब पोंभूर्णा यांना देण्यात आले निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे तालुका उपाध्यक्ष रोशन भडके, मनसेचे शहराध्यक्ष निखील कन्नाके, मनविसे तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, प्रमोद ढाक, प्रितम मोहुर्ले, महेश नैताम, आशिष आर. नैताम, कुनाल ढोले, प्रेम अल्लीवार, विवेक विरूटकर, अनूज घडसे, स्वप्नील चछाने, नयन मोरे, हेमंत उराडे, प्रविण पातळे व मनसे तथा मनविसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments