*शेतकऱ्यांना नवीन विद्युत कनेक्शन देणे भाजपा सरकारने केले बंद.!*
*विहिरी दिल्यात पण कनेक्शन नाही, शेतात खड्डे खोदून काय अर्थ..??? अश्या विहिरी कोणत्या कामाच्या..???* शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांना प्रश्न.
*शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देणे तात्काळ सुरू करा. अन्यथा विधानसभा निवडणुकी मध्ये कोणताही शेतकरी मतदान करणार नाही.!* @वैभव_पिंपळशेंडे
पोंभुर्ना: सरकारने शेतकऱ्यांना सिंचन विहिरी दिल्या परंतु त्या विहिरीवर नवीन विद्युत कनेक्शन देणे मागील 7 ते 8 महिन्यांपासून बंद केलेले आहे. शेतकरी फक्त ऑनलाईन अर्ज करून आपला किमती वेळ वाया घालवू शकतात परंतु शासनाने डिमांड काढणे कायमचे बंद केले आहे.
त्यामुळे, शेतकरी त्यांच्या तोंडात येणाऱ्या घासाला आणि करपणाऱ्या शेतपिकाला पाणी करणार तरी कसे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांचे पीक त्यांच्याच डोळ्यासमोर पाणी नसल्यामुळे नष्ट होत आहेत तरीसुद्धा राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची थोडीही काळजी नाही. खरंच काळजी असेल तर तात्काळ शेतकऱ्यांना नवीन विद्युत कनेक्शन देणे सुरू करावे.
आपल्या भगात सोलर सक्सेस नाही त्यामुळे शेतकर्यांनी सोलर कनेक्शन वर बहिष्कार टाकला आहे. आणि शासनाने सोलर कनेक्शन कम्पल्सरी केले आहे. सरकारने जनतेला विचारून जनतेच्या हिताचेच निर्णय घ्यायला पाहिजे नाही नाकी हुकूमशाही पद्धतीने.
यामध्ये सरकार ने जनतेला विश्वासात न घेता सरळ नवीन विद्युत कनेक्शन देणे बाबतचे परिपत्रकच काढून टाकले आहे. यामुळे सर्व शेतकरी वर्ग सरकार वर नाराज झालेला आहे.
0 Comments