पाच वर्षात झाले नाही ते दोन दिवसात होणार!
जामतुकूम येथील आरो प्लांट दोन दिवसात होणार सुरू
सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे यांचे प्रयत्न
माजी सरपंच भालचंद्र बोधलकर यांनी दिली माहिती
पोंभुर्णा: शुद्ध आणि स्वस्त पाणी पिण्यासाठी नागरिकांना उपलब्ध व्हावे या उद्देशाने तालुक्यात बहुतेक गावात आरो प्लांटची उभारणी करण्यात आलेली आहे. मात्र बहुतेक गावातील आरो प्लांट बंद असून केवळ शोभेची वस्तू ठरली आहे.
तालुक्यातील जामतुकुम येथील आरो प्लांट मागील पाच वर्षापासूनच अर्थात सुरुवातीपासूनच बंद आहे. ही माहिती माजी सरपंच भालचंद्र बोधलकर यांनी श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर वैभव भाऊ पिंपळशेंडे यांना दिली. कार्य तत्पर असलेले वैभव पिंपळ शेंडे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित कंत्राटदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून ही समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून आज किंवा उद्या जामतुकुम येथील आरो प्लांट सुरू होईल अशी माहिती कंत्राटदार यांनी वैभव पिंपळ शेंडे यांना दिलेली आहे. त्यामुळे गावातील आरो प्लांट लवकरच सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. तसेच नागरीकानी वैभव पिंपळशेंडे यांचे आभार मानून कौतुकही केले आहे.
भालचंद्र भाऊ बोधलकर माजी सरपंच जामतुकुम, तालुका अध्यक्ष सरपंच संघटना
0 टिप्पण्या
Thanks for reading