गणेश मंडळाच्या नावाखाली नांदगावात भरतेय जुगाऱ्यांची कार्यशाळा?
पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज!
- ■ • ■
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
चंद्रपूर:सर्वत्र सध्या गणेश उत्सवाची धूम सुरू आहे. ठिकठिकाणी बाप्पाचे आगमन होऊन गणेश उत्सवामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश उत्सव साजरा करत असताना ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतांना दिसतात. परंतु मुल तालुक्यातील नांदगाव येथे गणेश मंडळाच्या नावाखाली जुगार चालत असल्याचे कळते.
नांदगावात अनेक गणेश मंडळ आहेत परंतु काही मंडळ, गणेश मंडळाच्या नावाखाली शाळेच्या वेळेप्रमाणे जुगाऱ्यांची कार्यशाळेची वेळ ठरते.
काही मंडळ देखावे दाखऊन जनतेचे मन जिंकतात तर काही मंडळ फक्त गणेश मूर्तीची स्थापना करून बाप्पाला समोर करून पाठीमागे जुगार खेळतात. अशाप्रकारे गणेश मंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार कार्यशाळेवर पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. विशेष म्हणजे जुगार खेळायला आलेल्या जुगार प्रेमींची योग्य व्यवस्था केली जात असल्याचे समजते आहे.
0 Comments