जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या निवासस्थानी गणरायाची पूजा
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
मुल: प्रतिनिधी राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी जी.प.अध्यक्ष, नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मां. संतोषसिंह रावत यांचे निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन श्री.गणरायाचे दर्शन घेऊन पूजा केली.व या निमित्ताने गणरायाकडे साकडे घालत राज्यातील लुटारू आणि भ्रष्टाचारी सरकार घालण्याची सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करत महायुती सरकारवर निशाणा साधला.
गणपती बाप्पाचे आगमन प्रत्येक घरात आणि मंडळामध्ये झाले आहे. आणि अशावेळी महाराष्ट्रावर अरिष्ठ आले आहे. बेरोजगारी, महिला अत्याचार, गुन्हेगारी या सर्व बाबी दूर कर आणि महाराष्ट्राला पुन्हा सुगीचे व आनंदाचे आणि मानवतेचे दिवस येऊ दे अशी बापाच्या चरणी प्रार्थना करतो, अशी प्रार्थना त्यांनी केली असून महायुती सरकारवर आग पाखड केली आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी राज्यातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विधानसभेचे भावी आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंहरावत यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली.
या वेळी सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, सौ. ममता रावत, दीपक रावत, रुपल रावत, मोना रावत, कांग्रेस महासचिव शिवा राव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार, कांग्रेस जिल्हा महासचिव, मुल तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरू गुरूनूले, शहर अध्यक्ष सूनिल शेरकी, ज्येष्ठ मार्गदर्शक बंडू गुरनुले, राजू पाटील मारकवार, युवक अध्यक्ष पवन निलमवार, बल्लारपूर पदाधिकारी माकोडे, अध्यक्ष करीम भाई, प्रशांत उराडे, बाजार समिती संचालक, किशोर घडसे, सुमित आरेकर, अखिल गांग्रेडीवार, जालिंदर बांगरे,राहुल मुरकुटे,हसन वढई , डॉ .लेंनगुरे, शांताराम कामडे, दशरथ वाकुडकर, ओबीसी सेल राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, कैलाश चलाख, विवेक मुत्यलवार,अतुल गोवर्धन,संदीप मोहबे, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार,लीना फुलझेले, श्यामला बेलसरे,समता बनसोड,राधिका बुक्कावार,सीमा भसारकर, नाजुका लाटकर, यांचेसह ग्रामीण व शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Thanks for reading