वैशाली बुरांडे यांची काँग्रेसच्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
प्रियाताई पातळे यांना शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी
पोंभुर्णा : ३० सप्टेंबर २०२४
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष एक्शन मोडवर असून प्रचाराची रणधुमाळी राबवली जात आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस गावोगाव पिंजून काढत आहे. मध्यवर्ती बँकेचे जिल्हा अध्यक्ष व काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांची घोडदौड चालू आहे. काँग्रेस कार्यकर्ते संतोष सिंह रावत यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा महिला काँग्रेस च्या तालुका व शहर अध्यक्ष यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नम्रता ठेंमस्कर यांनी नुकतीच पोंभुर्णा महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी डोंगरहळदी तुकुम येथील ओबीसी (तेली) समाजाच्या पदवीधर होतकरू असलेल्या चेक हत्ती बोडी ग्रामपंचायत सदस्य व तिरुपती महिला बचत गटाच्या अध्यक्षा यांची निवड करण्यात आली असून नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांनी दिले आहे.
पोभूर्णा शहर अध्यक्षा पदावर पदवीधर व ओबीसी संवर्गातील कुंभार समजात सक्रिय असलेल्या आणि नेहमी सामाजिक चळवळीत सहभाग घेणाऱ्या व "गोरोबा महिला बचत गटा"च्या अध्यक्षा असलेल्या आणि महिला काँग्रेसच्या पदावर कार्य करणाऱ्या प्रियाताई महेश पातळे यांची शहर अध्यक्षपदावर नियुक्ती केली असून त्यांनाही जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.
दोन्ही पदाधिकाऱ्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे,काँग्रेस नेते सी. डी. सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत, जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्षा नम्रता ठेमस्कर,तालुका अध्यक्ष वासुदेव पाल,ओमेशवर् पदमगिरवार धम्मा निमगडे, माजी सरपंच भालचंद्र बोधलकर व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading