Advertisement

बल्लारपुर विधानसभा निवडणूक शिवसेना (उबाठा) पक्ष पुर्ण ताकतीने लढणार... गद्दारांचा सुड घेण्याकरिता ' विधानसभा ' विजयोत्सव म्हणजे पक्षीय आत्मसन्मान ' मशाल ' चिन्ह घरा-घरात पोहचवुन राज्य-हिताची साक्ष द्या!...

बल्लारपुर विधानसभा निवडणूक शिवसेना (उबाठा) पक्ष पुर्ण ताकतीने लढणार...


गद्दारांचा सुड घेण्याकरिता ' विधानसभा ' विजयोत्सव म्हणजे पक्षीय आत्मसन्मान


' मशाल ' चिन्ह घरा-घरात पोहचवुन राज्य-हिताची साक्ष द्या!...


-पोंभूर्णा येथील "शिवसंवाद पदाधिकारी" मेळाव्यात शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांचा "लढायचं आणि जिंकायचंच" हुंकार


पोंभूर्णा :- ' बल्लारपुर विधानसभा ' पुर्व-विदर्भ नियोजनाकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागीय नेते तथा माजी मंत्री (महा.राज्य) मा.
ना.श्री.भास्करराव जाधव साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ' सुमन मंगल कार्यालय, सभागृह पोंभुर्णा येथे भव्य ' निष्ठावंत शिव-संवाद मेळावा ' आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांना निष्ठावंताची उपमा देऊन ' गद्दारांचा सुड ' घेण्याकरिता आपण ही विधानसभा शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने लढवून जिंकण्याचा निर्धार करूया. तरच निष्ठावंत शिवसैनिकांच्या भावनांना प्रज्वलित करता येईल. असे मत यावेळी विदर्भ संपर्क प्रमुख माजी मंत्री आमदार श्री भास्कर जी जाधव साहेब यांनी व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या