वनविभागाच्या नवीन बांधकामात अवैध, निकृष्ट रेतीचा वापर ?
या कंत्राटदारावर मेहरबानी कुणाची
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
चंद्रपूर: मध्य चांदा वनविभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व वनपरिक्षेत्रात कार्यालय व कर्मचारी निवास इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परंतु हे बांधकामात अवैध आणि निकृष्ठ दर्जाच्या रेतीचा वापर केला जात आहे. माहीत असूनही या बांधकामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याने या कंत्राटदारावर मेहरबानी कुणाची? असा प्रश्न समोर येत आहे. राजुरा, विरुर, बनसडी, जिवती, धाबा, बल्हारशाह, पोंभुर्णा,कोठारी या वन परिक्षेत्रात या इमारतीचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. परंतु ही कामे निकृष्ठ दर्ज्याचे होत आहे निकृष्ठ दर्जाची रेती वापरली जात आहे.
विशेष म्हणजे कुठेही रेती उपासाला परवानगी नसताना या कामासासाठी रेती कुठून आणली जात आहे. त्याला कुणाचे पाठबळ मिळत आहेः अशी विचारणा आम जनतेतून होत आहे. वनक्षेत्रातील इतर काम सुद्धा याच ठेकेदारांना दिले जात असल्याची माहिती आहे.
0 Comments