Ticker

6/recent/ticker-posts

भामरागडातील शेतकऱ्यांना मिळाले आधुनिक शेतीचे धडे

भामरागडातील शेतकऱ्यांना मिळाले आधुनिक शेतीचे धडे


दरारा 24 तास न्युज नेटवर्क

मनोज गेडाम (तालुका प्रतिनिधी)
अहेरी : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विभाग गडचिरोली व कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली आणि उ-बुंटू शेतकरी उद्योग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने भामरागड येथील तहसील कार्यालयात तीनदिवसीय निवासी 'शेडनेट हाऊस व लागवड तंत्रज्ञान' प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे देण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन नागपूरच्या स्मार्ट विभागीय नोडल अधिकारी प्रज्ञा गोळघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, तहसीलदार किशोर बागडे, गडचिरोली सोनापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे,

अर्चना कोचर, तालुका कृषी अधिकारी कुणाल राऊत, उ- बुंटू शेतकरी उद्योग असोसिएशनच्या अध्यक्ष अनिता कासार, सचिव शरीफा पठाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी वरिष्ठ प्रशिक्षक हेमंत जगताप यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्रथमच अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम भामरागड येथे आयोजित करण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत विविध विषयांचे प्रशिक्षण दरवर्षी आयोजित केली जातात व यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुणे किंवा इतर भागांमध्ये जावे लागते. परंतु प्रथमच भामरागड या भागामध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान व त्यामधील भाजीपाला लागवड याविषयी शास्त्रीय पद्धतीने तज्ञ

व्यक्तींकडून मिळणाऱ्या माहितीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तहसीलदार किशोर बागडे यांनी अशा प्रकारे प्रशिक्षण महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने भामरागड येथे घेतल्याबद्दल आभार मानले व जास्तीत जास्त अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात यावे, असे सुचित केले. डॉ. किशोर झाडे यांनी भामरागडमधील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या सोयी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उ- बुंटू शेतकरी उद्योग असोसिएशन च्या महिला सभासदांनी भाजीपाला लागवड व त्याची विक्रीबाबत गावांमध्ये जनजागृती केली. तसेच कृषी विभागाच्या सहकार्याने उ बुंटू शेतकरी उद्योग असोसिएशन हे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेती मालाचे खरेदी विक्री व्यवस्थापन पुढील काळात करणार आहे. संचालन हेमंत जगताप तर आभार कुणाल राऊत यांनी मानले.

Post a Comment

0 Comments