Ticker

6/recent/ticker-posts

वृंदावन जिनिंगची सीसीआय खरेदी मान्यता रद्द करा ■ महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका तालुका प्रशासनाला दिले निवेदन

वृंदावन जिनिंगची सीसीआय खरेदी मान्यता रद्द करा


■ महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका तालुका प्रशासनाला दिले निवेदन

दरारा 24 तास न्युज नेटवर्क

जिवनदास गेडाम, संपादक 

चंद्रपूर:गोंडपिपरी तालुक्यात २२ हजार हेक्टर कापसाची लागवड केली आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस गोडपिपरी येथे विक्रीसाठी आणतात तालुक्यात चार जिनिंग आहेत. अशातच निनिंगवर हमीभावापेक्षा कमी हराने कापूस खरेदी करीत सल्याने शेतक-यांनी वृंदावन जिनिंगवर सीसीआय खरेदी कंद्राकडे कापूस विक्रीसाठी गरी केली. अशातच जिनिंग चालक शेतकयांची फसवणूक करीत असल्याचा संपजनक प्रकार सोमवारी उपडकीस आला दरम्यान, महाविकार आघाडीने वृंदावन जिनिंगची

सीसीआय खरेदी मान्यता रद्द करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. यासंदर्भात तालुका प्रशासनाला निवेदन दिले आहे.

कापसाच्या वजनात तफावत

आढळून आली, संतापलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी अहेरी-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग सोमवारी अडवून कार्यवाहीची मागणी केली. या आंदोलनाला तालुक्यातील महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून आंदोलनात सहभाग घेत सोमवारी निषेध नोंदविला. घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल येऊन मंगळवारी तहसीलदार, ठाणेदार, बाजार समिती सचिव यांना निवेदन देत शेतकऱ्यांची

लूट करणाऱ्या वृंदावन जिनिगची सीसीआय खरेदी मान्यता रद्द करण्याची मागणी करीत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख सुरज माड्ररवार, नगरसेवक सुनील संकुलवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल गायकवाड, कार्याध्यक्ष अरुण वासलवार,

काँग्रेस शहर अध्यक्ष राजू झाडे. सरपंच राजू राऊत, युवासेना तालुकाप्रमुख तुकाराम सातपुते, माजी उपसरपंच गौतम झाडे. पंकज डांगी, दर्शन वासेकर, बाजारसमिती संचालक अशोक रेचनकर, प्रवीण नरहरशेट्टीवार, शैलेश बैस, युवराज फलके, आशिष निमगडे, प्रशांत कोसणकर, हेमंत मेश्राम यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments