नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील पेंढरीत जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा वाढदिवस साजरा

नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील पेंढरीत जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा वाढदिवस साजरा


मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी 

 अहेरी:दिनांक ३/४/०२५. महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन ,कृषी ,मदत व पुनर्वसन ,विधी व न्याय ,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री माननीय नामदार एडवोकेट आशिष जयस्वाल साहेब यांचा वाढदिवस धानोरा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील पेंढरी या गावातील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात दिनांक 3 .4 .25 रोजी पेंढरी ग्रामपंचायतचे सरपंच पवन येरमे यांचे अध्यक्षतेखाली, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लंम वार  यांचे प्रमुख उपस्थितीत व शिवसेना धानोरा तालुका प्रमुख सोपानदेव मशा खेत्री यांचे मुख्य मार्गदर्शनात नाविन्यपूर्ण साजरा करण्यात आला.  

वाढदिवसाच्या शुभेच्छा कार्यक्रमात अनेकांच्या भुवया उंचावल्या .मुख्य मार्गदर्शक सोपानदेव मशाखेत्रि म्हणाले की जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ह्या राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. तरीपण माजी मुख्यमंत्री व आताचे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे एकनिष्ठ शिलेदार म्हणून जिल्ह्याचे सह पालकमंत्री नामदार एडवोकेट आशिष जयस्वाल यांची नियुक्ती केल्या गेली.

 त्यांचेकडे असलेल्या विभागनिहाय खात्यांची ओळख सर्वसामान्य आदिवासी बहुल क्षेत्रातील जनतेला व्हावी व साहेबांची नव्याने ओळख व्हावी हा उद्देश ठेवून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची विस्तृत माहिती सांगितली. 

प्रमुख अतिथी श्रीनिवास दुल्लंमवार म्हणाले की, विकासात्मक बाबीसाठी सह पालकमंत्री जयस्वाल साहेबांच्या  विभाग निहाय खात्यांचा नक्कीच दुर्गम भागातील जणतेसाठी उपयोग होईल .उच्च विद्याविभूषित राज्यमंत्र्यांना मन भरून शुभेच्छा दिल्या .अध्यक्ष स्थानावरून सरपंच पवन यरमे म्हणाले, एक नाविन्यपूर्ण जन्मदिनाचां शुभेच्छा पर कार्यक्रम घडवून येत  असल्याचा मनस्वी फार आनंद होतो.जयस्वाल साहेब प्रत्यक्षात पेंढरीला आले नसतील ,परंतु त्यांचा वाढदिवस  सर्वांना येथे साजरा करताना, त्यांना शुभेच्छा देताना अत्यानंद होत आहे .साहेबांच्या रूपाने दुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी बहुल तालुक्याचा विकास होऊन ,त्यांचे पाय पेंढरित  रुजावे असा आशावाद व्यक्त करून भावी आयुष्याच्या उदंड शुभेच्छा दिल्या. तेव्हा टाळ्यांचा गडगडाट झाला .

शुभेच्छा पर कार्यक्रमास शिवसेना उपतालुकाप्रमुख केवळ राम मडावी, दयानंद पवार ,राणू पाटील गावडे, उपेंद्रजी नाईक अध्यक्ष आ.वी .का., मनोज मंडल,नरेश धुर्वे ,राकेश उसेंडी, सनाकर आतला,रोशन मडावी, सेना सर्कल प्रमुख प्रशांत पैदापल्लीवार, सुकलालजी नाईक, रोशन लेनगुरे, केजुराम गावडे ,गजू पदा ,नामदेव मडावी, जयश्री मोहुरले, वैष्णवी गाव तुरे, सिंधू गावतुरे इत्यादी ग्रामस्थ व सेना कार्यकर्ते उपस्थित होते .

कार्यक्रमाचे संचालन व आभार पेंढरी सर्कल सेना प्रमुख प्रशांत पैदापल्लीवार यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू