जाम तुकुम रेती घाटावर अवैध रेती उत्खनन! आमदार महोदयांच्या पत्राचा दुरुपयोग
ट्रॅक्टर सह जेसीबी जप्त। उपविभागीय अधिकारी अपूर्वा बसूर यांची धडक कारवाई |
तरीही रेती तस्कर जुमानेना, तालुक्यात सर्वत्र तस्करांचा कहर ∆
विशेष प्रतिनिधी, चंद्रपूर: जिल्ह्याच्या अनेक भागात रेती तस्करांचे जाळे पसरले आहे. जिल्ह्यात विक्रमी घरकुलांना मंजुरी देण्यात आली. मात्र रेती अभावी घरकुलांचे स्वप्न अधांतरीच दिसत आहेत. असे असले तरीही रेती माफिया मात्र चढ्या दराने इतरत्र रेती विकून मालामाल होताना दिसत आहेत.
पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकूम येथील घाटावर रेती चोरट्यांचा धुमाकूळ माजला आहे. नदीतील रेती काढून बाहेर स्टॉक करून ठेवण्यात आला. यावर महसूल प्रशासनाने कारवाई करत या स्टॉकला सील लावला. मात्र रेती तस्करांनी नवीन शकल लढवत घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न धरून या विभागाचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले, अशी सूत्रांनी माहिती दिली.घरकुलधारकांच्या निवेदनाची गंभीर दखल घेऊन सुधीर भाऊंनी संबंधित विभागाला पत्र व्यवहार केला. या पत्राचा फायदा घेत रेती तस्करांनी गैरफायदा घेत रेती तस्करी पुन्हा सुरू केली.
या तस्करीत गोंडपिपरी च्या उपविभागीय अधिकारी अपूर्वा बसूर यांनी या घाटावर चालणाऱ्या जेसीबी व वाहनांवर जप्तीची कारवाई केली.
0 टिप्पण्या
Thanks for reading