दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: प्रतिनिधी
संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे पैसे रखडल्याने अनेक गरजू लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी माहिती समोर येत आहे.
या योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबवण्यात येतात. निराधार, अपंग, अनाथ, विधवा आणि इतर गरजु लोकांसाठी आर्थिक मदत पुरवणारी ही योजना आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी योजनेतील पैशाचे वितरण वेळेत न झाल्याने अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वृद्ध लाभार्थ्यांवर व निराधार महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे जेणेकरून गरजू लोकांना वेळेत मदत मिळू शकेल व त्यांची उपासमार थांबवता येईल.
जुगाव येथील वृद्ध लाभार्थी इसन डोमा चुदरी यांनी सांगितले की, तीन महिन्याचे पैसे अजून आले नाही. दर दोन दिवसांनी बँकेत चकरा मारून मारून थकून गेलो आहोत, परंतु पैसेच आले नसल्याचे बँक वाले सांगत असतात. हे ऐकून गेल्याच पावलाने परत यावे लागत आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading