=======================
शिवसेना जिल्हाप्रमुख यांचा वाढदिवस विशेष
=======================
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर एका नव्या धूमकेतूचा उदय झाला आहे.राजकीय, सामाजिक क्षेत्रातील एक तरुण, उमदे उत्तुंग, संवेदनशिल व्यक्तीमत्व म्हणुन राकेशभाऊ बेलसरे यांची ओळख आहे. जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असल्यामुळे लोकांनी विश्वास टाकत लोकप्रतिनिधी म्हणुन कार्य करण्याची संधी दिली. याच जबाबदारीचे भान ठेवत एक लोकप्रतिनिधी म्हणुन आपल्या कार्याने लोकांचा विश्वास कमावत स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळेच सलग तिसऱ्यांदा त्यांच्या नेतृत्वात आष्टी ग्रामपंचायतीच्या कारभाराची धुरा त्यांच्याकडे सोपविली.
गोरगरीब, गरजू लोकांच्या मदतीला एका हाकेवर धावून जाण्याची वृत्ती, गोरगरीब रुग्ण, गरजू व्यक्ती यांना दिलेल्या मदत वेळप्रसंगी स्वतः रक्तदान करुन केलेली मदत यातून त्यांच्यातील संवेदनशिलतेचा वारंवार परिचय होतो.
राजकीय क्षेत्रात वावरत असताना व सामजिक सेवा करत असताना त्यांनी कधी प्रसिद्धीचा मोह केला नाही. आज राजकीय व सामजिक क्षेत्रात त्यांनी जे स्थान निर्माण केले आहे ते स्वतःच्या मेहनतीमुळे व कार्यामुळे.
त्यांनी अनेक जिवाभावाची माणसे जोडली व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत कार्य केले. राजकीय जीवनात वावरताना अनेकदा टीकेचे धनी व्हावे लागते, ती त्यांच्याही वाट्याला आली. कात्याकडेही आली परंतु या सर्व परिस्थीतीवर मात करत खंबीरपणे आपली वाटचाल सुरू ठेवली.
यामुळेच आज एका राजकिय पक्षाचे (शिवसेना) जिल्हा प्रमुख म्हणुन काम करण्याचीत्यांनासंधी मिळाली. यापदाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी याचा पुरेपूर वापर करावा. व आपल्या सोबत जुळलेल्या माणसांशी जुळलेली नाळ कायम ठेवत आपुलकीची व मायेची अशीच माणसे आपल्या आयुष्यात कमवत लोकांचा विश्वास सार्थ ठरवत यशोशिखर गाठावे. त्यांच्या हातून समजपयोगी कार्य असेच निरंतर घडावे या सदिच्छासह त्यांना उत्तम व दीर्घायुष्य लाभो. त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....
0 टिप्पण्या
Thanks for reading