Advertisement

🌦️दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात देशी विदेशी दारूची खुलेआम विक्री 


🌦️अहेरी तालुक्यातील राजाराम खंडाळा, मनेराजाराम,येचली येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्री

मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी 

अहेरी: दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अनेक गावात, गल्लीबोळात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. हा धंदा दिवसेंदिवस अधिकच फोफावत चालल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. 

आदिवासी विभागाचा केंद्रबिंदू असलेल्या अहेरी तालुक्यातील राजाराम, खंडाळा, मनेराजाराम, येचली व आजूबाजूच्या अनेक गावात अवैधरीत्या देशी-विदेशी दारू व बियर खुलेआम विकल्या जात आहे. दारूच्या व्यसनाबाई गावातील अनेकांचे संसार अक्षरशः उध्वस्त झाले आहेत. अवैध दारू विक्रीवर व विक्री करणाऱ्या वर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी अनेकदा नागरिकांनी केली. मात्र नागरिकांच्या या मागणीची प्रशासनाने दखल घेतली नसल्याने दारू विक्रेत्यांचे अधिकच फावले आहे. जिल्ह्यात दारूबंदी असताना दारू चा महापूर येतोस कुठून असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत. 

येत्या आठवडाभरात ही अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर नागरिकांनी कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागाने दखल घेऊन या विभागातील अवैधरित्या चालणारी दारू बंद करून उद्ध्वस्त होणाऱ्या संस्कारांना वाचवावे अशी विनंती वजा मागणी नागरिकांनी केली आहे. 

जिल्हा पोलीस अधीक्षक तथा दारूबंदी विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून ही अवैधरित्या चालणारी व विकणारी दारू बंद करण्यात यावी, अशी मागणी जोर धरली आहे.

दारू विक्रेत्यांनी स्वतःहून दारू विक्री बंधन न केल्यास नावासकट तक्रार दाखल करण्यात येईल व प्रसारमाध्यमात देण्यात येईल याची दक्षता घ्यावी असे आवाहनही नागरिकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या