✍️ राजकीय वर्तुळात खळबळ, विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण
चंद्रपूर: राजकीय दु्ष्ट्या संवेदनशील असलेल्या नांदगाव ग्रा. पं. च्या सरपंच कु. हिमाणी दशरथ वाकुडकर यांना पुढील कालावधीसाठी सदस्य व सर पंच पदाधिकारी अपात्र ठरविण्यात येत असल्याचे अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे (चवरे) भा.प्र.से. यांनी दि. ८ एप्रिल २०२५ ला आदेश पारीत केला असल्याने नांदगावात राजकीय खळबळ उडालेली आहे.
मुल तालुक्यातील नांदगावच्या सरपंच हिमाणी वाकुडकर यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दि. १८ फेब्रुवारी २०२२ ला ग्रामसभेमध्ये 'ड' यादीनुसार घरकुल मंजूर करण्याचा ठराव ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला होता. परंतू सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी ग्रामसभेतील ठरावाला बगल देवून अपात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याबाबत आपले हितसंबंध साधून ड यादीतील क्रमवारीतील नावामध्ये खोडतोड करुन पात्र लाभार्थ्यांना वंचीत केले. सदर बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून आपल्या कर्तव्यात कसूर केलेले आहे.
तद्वतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील १० ते २० वर्षापासून असलेल्या विविध प्रकारचे वु्क्ष ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व वनविभागाकडून कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या तोड करुन परस्पर विल्हेवाट लावली होती. याबाबत अर्जदार क्रिष्णा बंडू मडावी व सुधाकर मोतीराम बांबोडे यांनी मा. अपर आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांचे न्यायालयात व्हिपीए अपील क्र. ३९(१)/४०/२०२३- २४ दाखल केले होते.
नांदगाव येथील उच्च शिक्षित महिला सरपंच हिमाणी वाकुडकर यांनी लोकसेवक व गावच्या प्रथम नागरिकांकडून अशा प्रकारच्या चुका आपले कर्तव्य पार पडताना होणे अपेक्षित नसल्याचे मत नमुद केलेले आहे.
मनमुजोरी व हुकूमशाही सरपंचाचा अस्त होऊन लोकशाहीचा उदय झाला. नांदगावातील प्रत्येक नागरिकांना न्याय मिळाला.
..... मंगेश मगनुरवार माजी सरपंच नांदगाव,
0 टिप्पण्या
Thanks for reading