पोंभूर्ण्यात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
-मसाला भात करण्यात आले वितरण
पोंभूर्णा :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालूका पोंभुर्णा च्या वतीने दि.११ एप्रिलला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.शहरातून रॅली काढून शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकात आयोजित अभिवादन कार्यक्रमस्थळी मसाला भात वाटपही करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. महिलांना सुशिक्षित करण्यासाठी मोठा संघर्ष केला. समाजातील वाईट प्रथा-रुढींविरोधात त्यांनी वारंवार आवाज उठवला. पत्नी सावित्रीबाई फुलेंसोबत मिळून त्यांनी समाजातील महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्यांच्या या मोठ्या संघर्षामुळे आज कोट्यवधी महिला शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत,समाजामध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.इतकंच नव्हे तर अस्पृश्य समाजासाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून देणारे महात्मा फुले यांचे समाज कार्य फार मौलाचे होते शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथातून शेतकऱ्यांची व्यथा मांडणाऱ्या या महामानवाला त्यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे तालूका अध्यक्ष भुजंग ढोले,गुलाब गुरनुले,सदगुरु ढोले, छत्रपती गुरनुले,राहुल सोमणकर,गुरूदास गुरनुले,संदीप ढोले, नरेश ढोले,अंकुश लिंगलवार,नितीन दुम्मावार,गणेश पानावार,गौरव ठाकरे,शंकर मरचेट्टीवार,सुलभा ढोले,रेखा गुरनुले,पंचफुला गुरनुले,नंदा कोटरंगे,शारदा गुरनुले,दीपाली ठाकरे,सयाबाई गुरनुले आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Thanks for reading