- देवाडाखुर्द ग्रामपंचायतीची चौकशी करा
-विजय वासेकर यांची बीडीओंकडे तक्रार
पाणी वापर यंत्रणा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या घरात
पोंभुर्णा: तालुक्यातील देवाळा खुर्द या ग्रामपंचायतीत अनागोंदी कारभार सुरू असल्याचे पुरावे समोर येत आहेत.
पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची फिल्टर मशीन आणि मोटार काही पदाधिकाऱ्यांच्या घरात सहा महिन्यापासून असल्याचे आश्चर्यकारक व धक्कादायक सत्य समोर येत आहे. याबाबतीत संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे विजय वासेकर यांनी तक्रार दाखल करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.
त्यामुळे या तालुक्यात मोठ्या असणाऱ्या ग्रामपंचायतीत भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या तक्रारीबाबत संवर्ग विकास अधिकारी कोणती भूमिका घेतात? व काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading