देवकारणाच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या पिकअपला भीषण अपघात; 3 ठार, 24 जखमी
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | पोंभुर्णा – भटारी गावाहून बंदकपल्ली येथे देवकारणाच्या कार्यक्रमासाठी जात असलेली पिकअप (क्र. MH40 AK 6616) वाहन आष्टी–मुलचेरा मार्गावर रेंगेवाही पुलाजवळील वळणावर नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळून उलटली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. ही घटना 20 मे 2025 रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजता घडली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ईश्वर जगन्नाथ कुसराम (55), रंजिता सुधाकर तोडासे (44), व शुल्का कीर्तिराम आलाम (60) यांचा समावेश आहे. तिन्ही मृत व्यक्ती भटारी गावातील एकाच वॉर्डातील असून गावात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त पिकअपमधून जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने सर्व 24 जणांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान रंजिता तोडासे यांचा वाटेतच मृत्यू झाला, तर शुल्का आलाम यांचे रात्री 10 वाजता चंद्रपूर येथे निधन झाले.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे:
अलका उमेश वेलादी, दुर्योधन देवाजी कुमरे, लीना प्रफुल सोयाम, सखुबाई तलांडे, गंगू शेडमाके, शांताबाई तोडासे, विशाल शेडमाके, रंजूवाई कुमरे, गंगू वेलादी, कांता तोडासे, करण वेलादी, दोडाजी आत्राम, कविता वेलादी, दशरथ तोडासे, संपत वेलादी, अनुसया कुसराम, रामदास शेडमाके, सपना नैताम, खुशबराव सिडाम, विलास कुसराम इत्यादी.
या अपघातप्रकरणी पिकअप चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे करीत आहेत.
---
0 टिप्पण्या
Thanks for reading