तुकूम (हेटी) येथे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन
गडचिरोली: तुकूम (हेटी), ता. धानोरा, जि. गडचिरोली येथील ग्रामस्थांसाठी एक महत्त्वाची विकासात्मक पायरी म्हणून डॉ. नामदेव किरसान यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, माजी जि.प. सदस्य विनोद लेनगुरे, कुलदीप इंदुरकर, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, ग्रामपंचायत तुकूमचे सरपंच तोफा, शेवंता हलामी, माणिक सिडाम, मुबारक सय्यद सर, गणेश कुळमेथे, गेडाम तुकूम, मंगलदास सिडाम, विलास मेश्राम, विपुल मेहर, आयुष क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे तुकूम गावातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असून, ग्रामस्थांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होणार आहे. यावेळी उपस्थित सर्वांनी खासदार डॉ. किरसान यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या
Thanks for reading