Advertisement

चकफुटाणा गावात सी.सी. रोडच्या चौकशीसाठी गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश #

चकफुटाणा गावात सी.सी. रोडच्या चौकशीसाठी गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश #


दरारा 24 तास न्युज नेटवर्क |
पोंभुर्णा, 19 मे 2025 – चकफुटाणा गावातील श्री. तुळशिराम रोहनकर ते श्री. संतोष पुडके यांच्या घरापर्यंत बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट (सी.सी.) रस्त्याच्या कामाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर, पंचायत समिती पोंभुर्णा येथील गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

गट विकास अधिकारी कार्यालयाने कनिष्ठ अभियंता कु. अचल चन्नावार यांना दिनांक 19 मे 2025 रोजी पत्राद्वारे सूचना दिली असून, सदर रस्त्याचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या संदर्भात श्री. अरविंद संपत मानकर, चकफुटाणा यांनी दिनांक 13 मे 2025 रोजी केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

सदर चौकशीमुळे गावात पुन्हा एकदा विकासकामांबाबत पारदर्शकता व उत्तरदायित्व याबाबत नागरिकांमध्ये अपेक्षा निर्माण झाली आहे. तसेच स्थानिक प्रशासनानेही या तक्रारीची गंभीर दखल घेत तत्काळ चौकशीसाठी आदेश दिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीची सकारात्मक चर्चा होत आहे.

गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारीसह चौकशीसंदर्भातील पत्र कनिष्ठ अभियंत्याला पाठवले असून, चौकशी अहवाल लवकरच कार्यालयात सादर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या