पोंभुर्णा तालुका | दरारा 24 तास न्यूज नेटवर्क...
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी गावातील सिमेंट रस्त्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शिवसेनेचे तालुका उपप्रमुख तथा स्थानिक कार्यकर्त्यांनी . या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, घोसरी गावात नुकतेच पूर्ण झालेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, त्यात शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
बांधकामात वापरलेला सिमेंट, लोखंड, मुरुम यांचा दर्जा अत्यंत खालावलेला असून रस्ता सुरू होताच काही ठिकाणी फाटून गेलेला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप शिवसेनेच्या प्रतिनिधींनी केला.
या प्रकरणात संबंधित ठेकेदार, ग्रामपंचायत अधिकारी व कामावर देखरेख करणाऱ्या तंत्रज्ञांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, असे शिवसेनेच्या निवेदनात म्हटले आहे.
या मागणीमुळे घोसरी गावातील राजकीय वातावरण तापले असून, प्रशासनाकडून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---
0 टिप्पण्या
Thanks for reading