Advertisement

वैनगंगा नदीत भीषण दुर्घटना: गडचिरोली रुग्णालयातील तीन शिकावू डॉक्टर बुडाले, शोधमोहीम सुरू

वैनगंगा नदीत भीषण दुर्घटना: गडचिरोली रुग्णालयातील तीन शिकावू डॉक्टर बुडाले, शोधमोहीम सुरू


चंद्रपूर-गडचिरोली | १० मे २०२५

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क...
आज दुपारी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीच्या पुलाजवळील पात्रात भीषण दुर्घटना घडली. गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयातील आठ शिकावू डॉक्टरांपैकी तीन जण नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सुट्टीचा दिवस असल्याने MBBS प्रथम वर्षाचे हे आठ विद्यार्थी नदीत आंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने गोपाळ गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे हे तिघे बुडाले. घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप पुलरवार आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत. आपत्ती व्यवस्थापन गट, पोलीस, आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे याच ठिकाणी काही काळापूर्वी चंद्रपूर येथील तीन बहिणींचाही बुडून मृत्यू झाला होता. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे ही पुन्हा एक भीषण घटना घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

प्रशासनाला आवाहन
या ठिकाणी दरवर्षी अशा घटना घडत असल्याने नदीपात्राजवळ इशारा फलक, जीवरक्षकांची नियुक्ती तसेच आंघोळीला बंदी असलेले स्पष्ट सूचना फलक लावणे अत्यावश्यक आहे.

सध्या बुडालेल्या तीन युवकांचा शोध घेतला जात असून पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या