Advertisement

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा


मुंबई : राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे एक भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. "धर्म, करुणा आणि कर्तृत्वाचे प्रतीक म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर!" या संकल्पनेभोवती फिरणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांना सहभाग घेता येणार आहे.

अहिल्याबाई होळकर या केवळ एक राजमाता नव्हत्या, तर समाजसेवेचे व नेतृत्वाचे जाज्वल्य प्रतीक होत्या. त्यांनी देशभरात मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी यांची उभारणी करत सांस्कृतिक पुनरुत्थानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा एक सशक्त माध्यम म्हणून ही निबंध स्पर्धा ठेवण्यात आली आहे.

स्पर्धेची वैशिष्ट्ये

राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये सहभागाची संधी

आकर्षक पारितोषिके

सर्व सहभागींसाठी सहभाग प्रमाणपत्र

सर्व वयोगटांना खुली संधी

प्रत्येक स्पर्धक केवळ एकाच भाषेतील स्पर्धेत सहभागी होऊ शकतो


महत्त्वाच्या तारखा

२५ मे ते ३० मे २०२५ : नाव नोंदणी व निबंध PDF स्वरूपात पाठविण्याची अंतिम मुदत

०५ जून २०२५ : वेबसाईटवर निकाल जाहीर

३० जून २०२५ पूर्वी सर्व सहभागींस प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल


नोंदणी लिंक : https://forms.gle/1nQxtXzF93zs3tpQ6
अधिक माहितीसाठी संपर्क : 9821704350, 9082528568, 8082762162

राज्यभरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन राजमातांच्या कार्यास उजाळा देण्यासाठी निबंध सादर करावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या