Advertisement

पोंभुर्णा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये असंतोष; शिंदे गटात प्रवेशाची शक्यता

पोंभुर्णा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये असंतोष; शिंदे गटात प्रवेशाची शक्यता


पोंभुर्णा: तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांमध्ये तालुका व जिल्हा नेतृत्वाविरोधात नाराजीचा सूर वाढत आहे. या असंतोषामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. यात माजी तालुकाप्रमुखाचा समावेश असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.

तालुकाप्रमुख स्वतःच्या भल्याच्या राजकारणासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. असाच काहीसा अनुभव अनेक कार्यकर्त्यांचा आहे. खासदार भास्कर जाधव यांच्या कार्यक्रमाच्या वेळेस वाहनं नेणाऱ्या कार्यकर्त्यांना अजूनही पैसे मिळाले नाही. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारातही शिवसेनेचा एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आला नव्हता असा आरोप होत आहे. अनेक कारणे या नाराजीची असू शकतात..

या नाराजीमुळे पोंभुर्णा तालुक्यातील अनेक शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. 

पोंभुर्णा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीचा परिणाम म्हणून शिंदे गटात प्रवेश करण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. या घडामोडींचा स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या