आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पोंभुर्णा तालुका पत्रकार संघातर्फे अभिवादन
पोंभुर्णा (प्रतिनिधी) – मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पोंभुर्णा तालुका पत्रकार संघातर्फे अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. सुरज गोरंतवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष सुरज गोरंतवार यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यांच्या कार्याची आठवण करून देत उपस्थितांनी मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.
सभेचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष श्री. जीवनदास गेडाम यांनी केले. यावेळी नगरपंचायतचे नगरसेवक श्री. बालाजी मेश्राम, पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष श्री. जीवनदास गेडाम, श्री. रुपेश निमसरकार, श्री. सुरेश कोमावार, दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी श्री. विजय वासेकर, नवराष्ट्रचे श्री. भुजंगराव ढोले यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी पत्रकारितेतील आचार्य जांभेकर यांच्या योगदानाचा आढावा घेण्यात आला. त्यांनी स्थापन केलेले दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कशा प्रकारे समाजप्रबोधनाचे माध्यम ठरले, यावरही चर्चा झाली.
ब्युरो रिपोर्ट वैनगंगा न्युज लाइव्ह नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading