स्व. बाळा चिंतामन गोरे (LIC/MDRT/CM.CLU99V) यांच्या स्मृती प्रित्यर्थ समाजोपयोगी उपक्रम
सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे व कार्तिक गोरे यांचा प्रेरणादायी समाजसेवा प्रवास..
जिल्हा प्रतिनिधी – धर्मपाल कांबळे, चंद्रपूर जिल्हा
राजुरा तालुका, चंद्रपूर जिल्ह्यातील एक दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील अनेक समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीत साखरी वाघोबा गावातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे आणि त्यांचे सुपुत्र कार्तिक गोरे यांनी अपार संघर्षातून स्वतःचे जीवन घडवले आणि समाजकार्याच्या माध्यमातून लोकांसाठी आपले जीवन वाहिले आहे.
गरीब कुटुंबात जन्मलेले सुभाष गोरे यांचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांच्या वडिलांनी शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. सुभाष गोरे देखील लहानपणी गुरे-वासरे राखत, दुसऱ्यांच्या शेतात काम करत शिक्षण घेत होते. त्यांनी 1994 मध्ये दहावी पूर्ण केली आणि पुढील शिक्षणासाठी राजुरा येथे गेले. त्यांच्या मोठ्या बंधू, स्वर्गीय बाळा चिंतामन गोरे यांच्या प्रेरणेने त्यांनी अनेक अडचणींवर मात केली.
समाजाप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून सुभाष गोरे यांनी निःस्वार्थी समाजसेवेची दिशा निवडली. त्यांनी विविध गावांमध्ये मंदिर, शाळा, सभामंडप बांधून दिले तसेच आर्थिक मदतही केली. स्वतःच्या गावात पाण्याची टंचाई असताना, त्यांनी आपल्या घरी पाण्याची सोय उपलब्ध करून ती गावकऱ्यांसाठी निशुल्क खुली केली. जनावरांसाठीही पाण्याचे स्रोत सुरू ठेवले.
स्वामी विवेकानंद अनाथ आश्रम शाळा, रामपूर येथे त्यांच्या नातवाचा वाढदिवस अनाथ मुलांसमवेत साजरा करताना कपडे, पुस्तकं, वह्या आणि आर्थिक मदत वाटप करण्यात आली. डेबू सावली वृद्धाश्रमात फळवाटप व अन्नदान करण्यात आले. राष्ट्रीय कीर्तनकार ठाकरे महाराज यांच्या आश्रमात आणि बुद्ध विहार, साखरी येथेही मदत करण्यात आली. प्रियदर्शिनी शाळा, साखरी येथे कार्तिक गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सुभाष गोरे आणि कार्तिक गोरे यांच्या समाजसेवेची दखल घेऊन आमदार देवराव भोगळे, माजी आमदार वामनराव चटप, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, आणि स्वर्गीय बाळू उर्फ धानोरकर (माजी खासदार) यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सुभाष गोरे व कार्तिक गोरे यांचा हा कार्यप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading