प्रयोगशील शेतकरी, कुशल वेल्डर आणि भजनकलाकार रामभाऊ वांढरे यांचे दुःखद निधन – विविध क्षेत्रांत मोठी पोकळी
(ता.प्र. पोंभूर्णा) – पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील सुप्रसिद्ध वेल्डिंग व हार्डवेअर क्षेत्रातील कुशल कारागीर, प्रयोगशील शेतकरी आणि ‘गुरूदेव सेवा मंडळा’चे भजनकलाकार रामभाऊ वांढरे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने ग्रामविकास, कृषी, अभियांत्रिकी कौशल्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी दरी निर्माण झाली आहे.
रामभाऊ वांढरे हे केवळ एक वेल्डर नव्हते, तर त्यांचं तांत्रिक ज्ञान, कामातील काटेकोरपणा आणि नाविन्यपूर्ण प्रयोग हे एखाद्या अभियंतालाही प्रेरणा देणारे ठरले. त्यांच्या कामातला दर्जा आणि परिश्रम यामुळे ते परिसरात ‘वेल्डिंग तज्ज्ञ’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या कामातून अनेक तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन दिलं आणि स्वावलंबनाचं बळ दिलं.
शेतीच्या क्षेत्रातही रामभाऊ वांढरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशील शेती केली. पर्यावरणपूरक आणि उपयुक्त शेती पद्धती राबवून त्यांनी परिसरात नवा आदर्श निर्माण केला.
सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा मोठा वाटा होता. गुरूदेव सेवा मंडळातर्फे ते एक उत्कृष्ठ भजनकलाकार होते. त्यांचा आवाज, त्यांची भावपूर्ण सादरीकरणशैली यामुळे गावोगावच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांना विशेष मान होता.
त्यांच्या निधनाने केवळ चिंतलधाबा नव्हे तर संपूर्ण पोंभूर्णा तालुक्यात शोककळा पसरली आहे. समाजकारण, शेती, तांत्रिक कौशल्य आणि भजनसेवा या चारही क्षेत्रांत त्यांनी दिलेलं योगदान हे सदैव स्मरणात राहील.
विनम्र श्रद्धांजली!
---
0 टिप्पण्या
Thanks for reading