३१ ग्रामपंचायती व १ नगरपंचायतीमधील ३६४५ लाभार्थ्यांचा समावेश
- दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा (ता. २३ मे): पोंभूर्णा तालुक्यातील ग्रामीण व शहरी घरकुल लाभार्थ्यांना शासनामार्फत मोफत ५ ब्रास रेतीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीमधील ३४९७ तसेच नगरपंचायत पोंभूर्णा अंतर्गत १४८, असे एकूण ३६४५ पात्र लाभार्थ्यांना हे वाटप होत आहे.
हे वितरण महसूल विभागामार्फत २२ मेपासून खालील १० रेती घाटांवरून सुरू करण्यात आले आहे:
जामतुकूम, घाटकुळ, भीमणी, मोहाडा (रै.), टोक, चेक बल्लारपूर-१, चेक बल्लारपूर-२, थेरगाव, कोसंबी रिठ व आष्टा.
तालुक्यात अंधारी व वैनगंगा नद्या असूनही, रेतीघाटांचा लिलाव न झाल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शासन स्तरावर निवेदने दिल्यानंतर ही विशेष योजना राबवण्यात आली आहे.
लाभार्थ्यांना सूचना:
पात्र लाभार्थ्यांनी संबंधित रेतीघाटावर खालील कागदपत्रांसह सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत हजर राहावे:
आधार कार्ड,मोबाईल,ग्रामसेवकाने दिलेली टीपी,नंबर टाकलेले ट्रॅक्टर-ट्रॉली वाहन,मजुरांसह
0 टिप्पण्या
Thanks for reading