आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश : मुल एसडीओ कार्यालयातील सभागृहाच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 6 जून :
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून, मुल येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयाच्या सभागृहाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे 1 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुल येथे झालेल्या आढावा बैठकीत सभागृहाच्या दुरवस्थेकडे आमदार मुनगंटीवार यांनी लक्ष वेधून तातडीने नूतनीकरणाचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने आवश्यक निधीची मागणी केली होती, ज्यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आता या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
सभागृह नूतनीकरणामुळे काय होणार?
नूतनीकरणानंतर प्रशासनाच्या विविध बैठका, कार्यशाळा आणि जनसंपर्क कार्यक्रम अधिक सुसज्जपणे आणि प्रभावीपणे पार पडू शकतील. याचा थेट लाभ नागरिकांना होणार असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
---
मुल तालुक्याचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या विकासकामांची यादी
मुल तालुक्यात मागील काही वर्षांत अनेक महत्त्वाची विकासकामे पार पडली असून, तालुक्याचा चेहरामोहराच बदलला आहे. काही ठळक कामे पुढीलप्रमाणे –
मुख्य रस्त्याचे विकास
कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृहाचे बांधकाम
नवीन तहसील कार्यालय आणि पंचायत समिती इमारत
जलपुरवठा योजना
आधुनिक स्टेडियम आणि स्विमिंग टँक
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय
आकर्षक इको पार्क
आठवडी बाजाराचे आधुनिकीकरण
याशिवाय, 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणीच्या प्रक्रियेत असून, सोमनाथ येथे कृषी महाविद्यालय आणि मुलींसाठी शुरवी महाविद्यालय देखील सुरू करण्यात आले आहे.
या सर्व प्रकल्पांसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका, प्रशासनावर केलेला दबाव आणि सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळेच मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading