दरारा 24 तास न्यूज नेटवर्क आणि वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क तर्फे त्रिवार मानाचा मुजरा
शूरता, शहाणपण आणि स्वाभिमान या त्रिसूत्रांनी आयुष्य जगणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पुत्र – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती! या महान योद्ध्याच्या स्मृतीस दरारा 24 तास न्यूज नेटवर्क आणि वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क तर्फे त्रिवार मानाचा मुजरा!
छत्रपती संभाजी महाराज हे केवळ तलवारीचे नव्हे, तर विचारांचेही धनी होते. त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी अपार कष्ट, संघर्ष आणि बलिदान दिले. बालवयातच अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवणाऱ्या संभाजी महाराजांनी शत्रूला केवळ युद्धात नाही तर बुद्धिमत्तेतही पराभूत केले.
त्यांचे जीवन म्हणजे अडथळ्यांवर मात करत स्वाभिमानाने जगण्याचा आदर्श. धर्मासाठी, राष्ट्रासाठी आणि स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. औरंगजेबाच्या अमानुष छळानंतरही आपल्या धर्मावर आणि संस्कृतीवर न सोडलेली निष्ठा, हेच त्यांचे खरे महानत्व दर्शवते.
आजच्या पिढीने त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेणे हीच खरी त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. राष्ट्रहितासाठी, स्वाभिमानासाठी आणि मूल्यांसाठी लढण्याची प्रेरणा आजही त्यांच्या चरित्रातून मिळते.
आजच्या या पुण्यदिनी, दरारा 24 तास न्यूज नेटवर्क आणि वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क कृतज्ञतेने आणि अभिमानाने त्यांना त्रिवार वंदन करते.
|| जय भवानी, जय शिवाजी ||
|| धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अमर रहें ||
0 टिप्पण्या
Thanks for reading