11 महिन्यांच्या तासिका तत्वावरील शिक्षक भरती; 1 जुलै रोजी मुलाखत
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या शासकीय निवासी शाळांमध्ये 2025-26 शैक्षणिक सत्रासाठी शिक्षक भरती करण्यात येत आहे. ही भरती तासिका तत्वावर 11 महिन्यांसाठी केली जाणार असून, इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखत 1 जुलै 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
शाळांचे ठिकाण व पदांची माहिती:
-
भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर
- इयत्ता 9 वी - 10 वी:
- सहायक शिक्षक: एम.ए. बी.एड (मराठी / सामाजिक शास्त्र)
- इयत्ता 6 वी - 8 वी:
- बी.ए. बी.एड (मराठी माध्यम)
- बी.ए. बी.एड (इंग्रजी माध्यम)
- इयत्ता 9 वी - 10 वी:
-
चिमूर शासकीय निवासी शाळा
- इयत्ता 9 वी - 10 वी:
- बी.ए. बी.एड (मराठी / हिंदी)
- बी.ए. बी.एड (सामाजिक शास्त्र)
- इयत्ता 6 वी - 8 वी:
- बी.ए. बी.एड (इंग्रजी)
- बी.ए. बी.एड (मराठी)
- इयत्ता 9 वी - 10 वी:
एकूण रिक्त पदे: 7
मुलाखतीचे ठिकाण व वेळ:
दिनांक 1 जुलै 2025, सकाळी 11:00 वाजता
ठिकाण: अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर
उमेदवारांनी सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्षरित्या उपस्थित राहावे. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. नियुक्त उमेदवारांना शासन नियमानुसार मानधन देण्यात येणार असून, मुलाखतीसाठी प्रवास भत्ता देण्यात येणार नाही, अशी माहिती सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी दिली आहे.
अधिक अपडेटसाठी वाचत राहा – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading