Advertisement

शरीरात पाण्याची कमतरता? ही लक्षणं दिली तरतरीत सावधानतेचा इशारा!



शरीरात पाण्याची कमतरता? ही लक्षणं दिली तरतरीत सावधानतेचा इशारा!



🫁 दरारा 24 तास न्युज नेटवर्क | आरोग्य विशेष

शरीरासाठी पाण्याचं महत्त्व आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पाणी म्हणजे जीवन. पण किती जण या जीवनदायिनी पाण्याचं महत्त्व खऱ्या अर्थाने समजून दिवसभर पुरेसं पाणी पितात? अनेकदा आपल्या दैनंदिन धावपळीत पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचे गंभीर परिणाम शरीरावर दिसू लागतात.

डिहायड्रेशनची सुरूवात होण्यापूर्वीच शरीर काही संकेत देतं. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. योगा एक्सपर्ट मयूर कार्तिक यांनी याबाबत एक व्हिडिओ शेअर करत पाणी कमी झाल्याची स्पष्ट लक्षणं सांगितली आहेत.

पाण्याची कमतरता ओळखण्याची लक्षणं:

🔹 लघवीचा रंग बदलणे

जर लघवीचा रंग गडद पिवळा किंवा नारिंगी होत असेल, तर हे शरीरातील पाणी कमी झाल्याचं पहिलं लक्षण असू शकतं.

🔹 बद्धकोष्ठता (कब्ज)

पाणी पचनक्रियेसाठी महत्त्वाचं आहे. पाणी कमी झाल्यास पोट साफ न होणे, जडपणा जाणवणे अशा तक्रारी वाढतात.

🔹 डोकेदुखी व थकवा

शरीर निर्जलीकरणाच्या स्थितीत गेल्यास सतत डोकेदुखी व थकवा जाणवतो. हे लक्षात आल्यावर लगेच पाणी आणि इलेक्ट्रोलाइट युक्त पेय घ्या.

🔹 तोंडाची दुर्गंधी

पाण्याची कमतरता झाल्यास तोंडात लाळेचे प्रमाण कमी होतं, त्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि दुर्गंधी येते.

🔹 मसल्समध्ये वेदना

ब्लड सर्क्युलेशन नीट न झाल्यामुळे स्नायूंमध्ये वेदना, शरीर आखडल्यासारखं वाटणं हेही लक्षण असू शकतं.

🔹 तोंड व घसा कोरडा पडणे

अचानक घसा आणि तोंड कोरडं पडत असेल, तर शरीर तुम्हाला सांगतंय – "मला पाणी हवं आहे!"

🔹 त्वचेचा कोरडेपणा

शरीरात पाणी कमी झाल्यावर त्वचाही कोरडी व निस्तेज दिसू लागते. यावर एकच उपाय – पुरेसं पाणी!


🧴 तज्ज्ञांचा सल्ला:
दररोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या. गरम हवामानात किंवा व्यायामानंतर पाण्याचं प्रमाण वाढवा. लिंबूपाणी, नारळपाणी, फळांचे रस हेही उपयुक्त ठरतात.


🩺 अशीच महत्त्वाची आरोग्यविषयक माहिती जाणून घ्या दरारा 24 तास व्हाट्सअप चॅनेलवर!
फॉलो करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा.


टॅग्स: #HealthTips #Hydration #DehydrationSymptoms #Darara24Taas #आरोग्य #पाणी #वेलनेस #डोकेदुखी #त्वचेसंवर्धन



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या