दरारा 24 तास न्युज नेटवर्क | ऑनलाईन डेस्क
सोशल मीडियावर सध्या एका ब्युटी पार्लरची भन्नाट आणि हटके जाहिरात तुफान व्हायरल होत आहे. या जाहिरातीत "जुनी बायको आणा आणि नवीन बायको घेऊन जा!" असा मजकूर वापरण्यात आला असून, यामुळेच ती जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे.
या अनोख्या जाहिरातीत जुन्या बायकोचा मेकओव्हर करून तिला ‘नवीन’ रुपात सादर करण्याची कल्पना मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पार्लरकडून ग्राहकांना घरपोच सेवा देखील दिली जात असल्याचं जाहिरातीत नमूद करण्यात आलं आहे.
ही कल्पनाशक्तीने परिपूर्ण जाहिरात पाहून अनेक सोशल मीडिया युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी ती अत्यंत सर्जनशील असल्याचं म्हटलं. एका युजरने तर लिहिलं, “ही जाहिरात पाहून हसू आवरत नाही, पण कल्पना भन्नाट आहे!” तर दुसऱ्याने म्हटलं, “या वर्षातील ही सर्वोत्तम जाहिरात ठरली!”
ही जाहिरात कुणी आणि कुठे तयार केली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सोशल मीडियावर तिचा जोरदार बोलबाला आहे. काहींनी ही कल्पना मनोरंजन म्हणून घेतली असून, काहींनी मात्र तिच्यावर टीकाही केली आहे.
नावीन्यपूर्ण जाहिरात तंत्र आणि विनोदी अंदाज यामुळे ही जाहिरात लवकरच चर्चेच्या शिखरावर पोहोचली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading