📍 चंद्रपूर | 18 जून
भद्रावती तालुक्यातील टाकळी, जेना आणि बेलोरा येथे चालणाऱ्या कोळसा खाणीतील समस्या आणि स्थानिकांवरील अन्यायाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भद्रावती तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली.
🗣️ बैठकीत त्यांनी कंपनीला स्पष्ट निर्देश दिले –
✅ स्थानिकांना प्राधान्याने रोजगार द्या
✅ 17 जुलैपूर्वी सर्व गावांमध्ये आरो (RO) मशीन बसवा
✅ भंगाराम मंदिराचे स्थलांतर पुनर्वसन पूर्ण झाल्यावरच करा
✅ कोळसा रॉयल्टी, पाणीप्रदूषण यावर सविस्तर माहिती द्या
✅ 375 एकर जमिनीची खरेदी लवकरात लवकर पूर्ण करा
💬 आमदारांनी कंपनीच्या अनियमित कामगिरीवर नाराजी व्यक्त करत, माजी सैनिकांच्या सुरक्षारक्षक कंत्राटावरही ठाम भूमिका मांडली.
👥 बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि आंदोलक मनोज ठेंगणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
📌 विशेष म्हणजे, आमदार मुनगंटीवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती आणि 48 तासांत बैठक घेऊन ठोस निर्णय घेतले.
0 टिप्पण्या
Thanks for reading