Advertisement

भिवकुंड चक व नागरेडी (सेलूर) परिसरात रेती तस्करीचा स्फोट! प्रशासन ‘डोळेझाक’ मोडीत काढणार कोण?

भिवकुंड चक व नागरेडी (सेलूर) परिसरात रेती तस्करीचा स्फोट! प्रशासन ‘डोळेझाक’ मोडीत काढणार कोण?


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | पोंभुर्णा तालुका

पोंभुर्णा तालुक्यातील भिवकुंड चक व नागरेडी (सेलूर) परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती तस्करी सुरू असून, प्रशासन व पोलिस यंत्रणांचे धक्कादायक दुर्लक्ष समोर येत आहे. घरकुलधारकांसाठी मोफत रेतीपुरवठ्याच्या आदेशाची आडमार्गाने अंमलबजावणी होत असून, रात्रभर ट्रॅक्टर व टिप्परचा वापर करून लाखो रुपयांची रेती चोरली जात आहे.

शासनाचे आदेश धाब्यावर – तस्करांचा उघड उघड धुमाकूळ!

शासनाच्या नियमानुसार सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच मोफत रेती व टीपी दिली जावी असा स्पष्ट आदेश असताना, या भागात रात्रभर रेती उपसा व वाहतूक सुरू आहे. यामुळे शासनाच्या उत्पन्नाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे, तर नैसर्गिक साधनसंपत्तीचीही लूट सुरू आहे.

महसूल आणि पोलिस यंत्रणा गप्प – संशयाच्या भोवऱ्यात अधिकारी!

तस्करीसाठी वापरली जाणारी वाहने नेहमीच्या रस्त्यांवरून उघडपणे फिरत असूनही महसूल व पोलिस विभाग कुठलीही कारवाई करत नसल्याने, स्थानिकांत संतापाचे वातावरण आहे. काही अधिकाऱ्यांची या तस्करीत संलिप्तता असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

नागरिकांचा इशारा – कारवाई नाही तर आंदोलन!

"जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा राष्ट्रीय मराठा गौरक्षण किसान सभा चे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर यांनी दिला आहे. तसेच, शासनाने रेती उपसणीसाठी पारदर्शक प्रक्रिया राबवावी आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या