🌀 वादळी वाऱ्याचा कहर : रावेर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान
📍 निंबोल, धामोडी, ऐनपूर गावांत नुकसानग्रस्त भागांची पाहणी
रावेर तालुक्यात काल आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आज निंबोल, धामोडी, ऐनपूर या गावांमध्ये कर्तव्यदक्ष तहसीलदार बंडू कापसे, नंदूभाऊ महाजन, राहुल पाटील गुरूजी यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करण्यात आली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. वाळके साहेब, किशोर पाटील, जितू पाटील, दुर्गेश पाटील, शांतीलाल पाटील, तलाठी, सर्कल अधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईत पावसाळी अधिवेशनासाठी उपस्थित असलेले आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून नुकसानभरपाईबाबत माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“मी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण खात्री दिली जाईल.”
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📝 https://youtube.com/@vainganganew?si=qGFGYcRQ1x6IUnxf
0 टिप्पण्या
Thanks for reading